प्रतिनिधी/शिराळा
वारणा(चांदोली) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे आज गुरुवार (दि. 22) जुलै रोजी दुपारी तीन वाजता अंदाजे, 2000 ते 4000 क्युसेक्स इतका विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. याबाबत सतर्कतेबाबतचा इशारा वारणा (चांदोली) धरण व्यवस्थापनाकडून वारणा नदीकाठच्या नागरीकांना देण्यात आला आहे.
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे धरणात २४४४१ क्युसेक्स इतका ओघ सुरू आहे. धरण ८१% टक्के भरले असून , गेल्या २४ तासात धरणातील पाणी साठ्यात २ टीएमसी वाढ झाली आहे. अजूनही पाऊस सुरू आहे.
Previous Articleजिल्हा रुग्णालय आवारातील रस्त्यावर निसरड
Next Article राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ








