प्रतिनिधी / वारणानगर
चांदोली धरणातील विसर्ग प्रति सेंकद ६५०० क्यूसेसने सुरू केल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू लागल्याने वारणा काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेली चार दिवस पडत असलेल्या दमदार पाऊसाने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर अनेक ठिकाणी गेले आहे नदी काठच्या गावांत पाणी शिरण्याची शक्यता आहे तसेच धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम आहे त्यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे काल दि. ६ रोजी गुरुवारी उघडले पाहिल्या दिवशी प्रति सेंकद ४५०० क्यूसेसने विसर्ग सुरू केला होता आज दुसऱ्या दिवशी प्रति सेंकद २००० रू. वाढवण्यात आला असून वीज निर्मितीसाठी १४०० क्यूसेंस व दरवाज्यातून ५१०० क्यूसेस असा ६५०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
चांदोली धरण क्षेत्रात आज अखेर १४५७ मि.मी. पाऊस पडला असून धरण ८५ टक्के भरले असून धरणातील पाणीसाठा २९.२५ टक्के झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








