ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी राज्यांमध्ये आणल्या जात असलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकांवर सुरू असलेल्या चर्चेवर, प्रतिक्रिया दिली. “जे कोणी लोकांचे धर्मांतर करत आहे ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाही. एखाद्याचे चांगले काम आणि व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. एखाद्या विशिष्ट धर्मात भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यासाठी लोक धर्मांतर करतात, असे आझाद उधमपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.