साधारणपणे 25 टक्क्यांनी किंमतीत वाढ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरोना महामारी आणि खराब हवामानामुळे आसाममधील चहा उत्पादन प्रभावीत झाले आहे. या कारणास्तव चहाच्या किमतीमध्येही वर्षाच्या आधारे 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती आहे.
दुसऱया बाजूला जुलै महिन्यापासून उत्पादन वाढत जाणार असून किमती कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिकचे चहा उत्पादन हे आसाममध्ये घेण्यात येत असल्याची माहिती आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला गुवाहाटी आणि कोलकाता येथील 23 आठवडय़ांच्या लिलावामध्ये आसामच्या चहाची किमत साधारणपणे 224 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. हाच दर वर्ष 2020 च्या समान कालावधीत 178.6 रुपये प्रति किलो राहिला होता. यामध्ये पारंपारिक आणि सीटीसी या दोन्ही चहाचा समावेश आहे.
निर्यातही अडचणीत
उत्तर भारतीय चहाची निर्यात 2021 च्या पहिल्या तिमाहीत घटून 2.73 कोटी किलोग्रॅमवर राहिली.कमी उत्पादनाचा प्रभाव मागील वर्षी लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी राहिले होते. चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत उष्णता व अन्य नैसर्गिक संकटाच्या तडाख्याने उत्पादनात घट राहिली असून यामुळे चहा उत्पादन प्रभावीत राहिले असल्याचे आसाम कंपनीचे सीईओ विजय सिंह यांनी सांगितले आहे.









