मुंबई
संघटीत क्षेत्रातील चहाच्या बागांना पहिल्या सत्रातील चहाच्या पानांचे उत्पादन 2020 च्या दरम्यान काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत आहेत. यात चार ते पाच कोटी किलोपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती रेटिंग एजन्सीच्या इक्राच्या एका अहवालात देण्यात आली आहे.
नेहमी उपस्थित असणाऱया कागारांपैकी बागेत काम करण्यासाठी 50 टक्के मजुरांना मान्यता दिली आहे. कोविड 19 च्या महामारीला रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्र आपले उत्पादन पूर्ण बंद न ठेवता काही प्रमाणात सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. यात चहा उद्योगाला लॉकडाऊनमधून मुक्त केले आहे. ही बाब दिलासादायक असून फक्त कामगारांच्या अभावी काहीशी उत्पादनात घट होण्याचे संकेत मांडले जात आहेत.
अंदाज
चालू वर्षात 2020मध्ये प्रामुख्याने भारतात स्थिर संघटीत व्यापारात प्रथमच तोडणीच्या उत्पादनासह वार्षिक उत्पादन 6 ते 7 टक्के आणि दक्षिण भारतात 5 ते 6 टक्क्मयांनी पाने तोडण्याचे काम प्रभावीत होण्याचा अंदाज इक्राचे उपाध्यक्ष कौशिक दास यांनी मांडला आहे.









