पोलीस अधीक्षक अजय बन्सल
प्रतिनिधी / गोडोली
वाहनधारकांनी निर्व्यसनी राहून वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात. व्यायामा बरोबर प्रदूषणमुक्त समाज निर्मितीसाठी सायकलींग रँलीव्दारे ’सडक सुरक्षा,जीवन रक्षा’ हा महत्वपूर्ण मेसेज दिला आहे. भविष्यात अपघातमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.चला,अपघात मुक्त सातारा जिल्हा अशी लौकिक निर्माण करु या,” असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालया बरोबर राज्य परिवहन विभाग आणि पोलीस विभागाने जिह्यातील राबविलेल्या 32 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप सायकल रँलीने करण्यात आला. राजवाडा ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दरम्यान पार पडलेल्या सायकल रँलीमध्ये सातारा सायकलिंग क्लबच्या 32 सायकलस्वार तब्बल 32 कि.मी. अंतर पार करत राजवाडा येथे रँलीच्या शुभारंभात सहभागी झाले. रँलीचा शुभारंभ पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या हस्ते सहाय्यक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी यांच्या सह परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकार, विविध संस्थेचे प्रतिनिधी, सातारा सायकलींग क्लबचे सभासद आणि 5 वर्षांपासून ते 70 वयोगटातील जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.रँलीव्दारे अपघात मुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृतीचे फलक,घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सायकल रॅलीमधील सायकलस्वारांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गतवर्षी राजस्थान ते काठमांडू असे 1800 कि.मी. अंतर 12 दिवसात सायकलद्वारे पूर्ण करणाया तुषार भोईटे याचा पदक देऊन सत्कार करण्यात आला. या रँलीत मोटार चालक,मालक संघटना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना,सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.









