बेळगाव / प्रतिनिधी
चलवेनहट्टी येथे दिवाळीनिमित्त नुकताच पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. यावेळी विलास कारेकर यांनी मराठी भाषेची पताका, मराठीचे महत्व, लोककलेची महती सांगणारे काव्य पोवाडय़ातून सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. छ. शिवरायांचे जीवन चरित्र पोवाडय़ाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम केले. त्याबरोबर शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांचे पोवाडे सादर करून उपस्थितांच्या मनात धर्म भक्ती जागवली.
प्रारंभी छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शाहीर विलास कारेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर देवेंद्र पाटील, तुकाराम गुंडू पाटील, वैभव संतोष आलगोंडी, विश्वनाथ संतोष आलगोंडी, मारूती सिद्राय पाटील, यल्लाप्पा नागेंद्र आलगोंडी, आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यांना विठृल कलखांबकर, संतोष पाटील, निलेश पाटील, विनायक पाटील, शुभम पाटील, पुंडलिक पाटील, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी गावातील विविध मंडळाचे कार्यकर्ते, तरूण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.









