सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरांमध्ये जिओ केबल साठी रस्त्याच्या बाजूला चर खोदण्याचे काम चालू असून वैश्य वाड्याच्या लगत शिवाजी चौक गवळी तिठ्यापर्यंत चर खोदून चार दिवस उलटले मात्र त्याच चरामधून लोकांना जावं लागत आहे. याबाबतची माहिती नगरपरिषदेचे अभियंत्यांना माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी माहिती दिली. गेले चार दिवस यावर कोणतेही कार्यवाही झालेली नसून सोमवारी संध्याकाळी एका महिलेच्या पायाला याच खोदाईमुळे गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत आज दुपारपर्यंत उपाययोजना न केल्यास रस्ता बंद करण्यात येईल तसेच नगरपरिषदेचा निषेध करण्यात येईल आणि शेताचे बोर्ड लावण्यात येतील याची समज नगरपरिषदेने घ्यावी अन्यथा संपूर्ण काम बंद करण्यात येईल असा इशारा सुरेश भोगटे यांनी दिला आहे









