ओटवणे / प्रतिनिधी-
चराठा गावठाणवाडी येथील रहिवासी निलिमा यशवंत वाळके (८०) यांचे शुक्रवारी ४ जून रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चराठा सरपंच बाळू वाळके तसेच सूर्यकांत वाळके यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









