ऑनलाईन टीम / चंदीगढ :
चरणजीत सिंग चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यांनतर मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस हायकमांडकडून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर चन्नी यांनी काल सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले होते. आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.









