क्रिस्टल हीलिंग ही एक वैज्ञानिक पूरक उपचारपद्धती आहे ज्यामध्ये क्वार्ट्ज, ऍगेट, ऍमेथिस्ट किंवा ओपल्ससारखे अर्ध-मौल्यवान दगड आणि क्रिस्टल्स वापरतात. या क्रिस्टलमध्ये उपचार शक्ती आहेत. क्रिस्टल हीलिंगच्या अभ्यासकांचा असा विश्वास आहे की ते कमी ऊर्जा वाढवू शकतात, वाईट ऊर्जा टाळू शकतात, अवरोधित ऊर्जा सोडू शकतात आणि शरीराच्या आभा बदलू शकतात. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे क्रिस्टल्सना आपली इच्छाशक्ती नसते. आपण सांगू तसे ते काम करतात. Pranic Crystal Healing मध्ये क्रिस्टल्स वेगवेगळय़ा प्रकारचे वापरले जातात. क्वार्ट्ज क्रिस्टल्स बहुतेकदा क्रिस्टल उपचारांमध्ये वापरले जातात. या पद्धतीमध्ये, अभ्यासक शरीराच्या वेगवेगळय़ा भागांवर क्रिस्टल्स ठेवतात, बहुतेकदा चक्रांशी निगडित आजार असल्याने चक्राच्या जवळ क्रिस्टल्स ठेवले जातात. अन्यथा प्रॅक्टिशनर एनर्जी ग्रिड तयार करण्याच्या प्रयत्नात शरीराभोवती स्फटिक ठेवतो, ज्याचा उद्देश हा उपचार घेणाऱयाचा आभा हा उपचारात्मक उर्जेने भरावा असा असतो.
Pranic Crystal Healing मध्ये वेगवेगळय़ा रंगांचे क्रिस्टल्स वापरले जातात. प्रत्येक रंगाच्या क्रिस्टलचं काम हे वेगळं असतं. हे क्रिस्टल मानवी चक्रातील दूषित ऊर्जा बाहेर काढून चक्राला चांगली ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. पेशंटला ज्या भागात वेदना होत असतील त्या चक्रावर किंवा शरीराच्या त्या भागाजवळ हे क्रिस्टल्स ठेवले जातात व त्यांना तिथली दूषित ऊर्जा बाहेर काढून चांगली ऊर्जा पुरविण्याचे सांगितले जाते. थोडय़ा वेळात क्रिस्टल्स सर्व दूषित ऊर्जा बाहेर टाकतात त्यामुळे पेशंटला बरे वाटते, त्याचे दुखणे कमी होते.
उपचाराव्यतिरिक्त क्रिस्टल्सचा वापर हा संरक्षणासाठी केला जातो. काही क्रिस्टल हे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्तींपासून वाचवतात. हे क्रिस्टल ती दूषित, नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतात. ठराविक दिवसांनी आपण ते क्रिस्टल स्वच्छ केले की ती दूषित ऊर्जा नष्ट होते. काही क्रिस्टल हे तुमच्या घराची, व्यवसायाची ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. तुम्ही ज्या वास्तूत राहता किंवा ज्या वास्तूत काम करता तिथली ऊर्जा चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल, तुमची जवळची मंडळी ही त्या सकारात्मक ऊर्जेमुळे सुदृढ राहतील. यासाठी ठराविक प्रकारचे क्रिस्टल्स वापरले जातात.
Pranic Healing मध्ये क्रिस्टल्स हे पांढरे, गुलाबी, हिरवा, जांभळा ह्या रंगाचे असतात. प्रत्येक रंगाचं काम हे वेगळं आहे. हिरवा रंग दूषित ऊर्जा शरीराबाहेर काढण्याचं काम करतो. गुलाबी रंग असलेला क्रिस्टल आपल्याभोवती सकारात्मक उर्जेचं वलय तयार करतो. असे प्रत्येक क्रिस्टलचे गुणधर्म आहेत. कोणता क्रिस्टल कधी, कसा वापरायचा, त्या क्रिस्टलला सूचना कशा द्यायच्या हे Crystal Healing मध्ये शिकवले जाते. आता काही क्रिस्टल बद्दल माहिती घेऊ.
1.सायट्रिन – सायट्रिन आनंद आणि उपस्थितीचे स्फटिक आहे. हा एक उत्कृष्ट प्रकटीकरण दगड आहे आणि आम्हाला आमच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास, सकारात्मक राहण्यासाठी आणि कृतज्ञतेने जीवनात चालण्यास प्रोत्साहित करते. हे सौर प्लेक्सस चक्राशी संबंधित आहे आणि श्वासोच्छवासाच्या वेळी वापरण्यासाठी एक शक्तिशाली क्रिस्टल
आहे.
2.मॅलाकाइट – मॅलाकाइट हा एक सुंदर पन्ना-रंगाचा दगड आहे जो तुम्हाला शक्ती आणि धैर्य देऊ शकतो, पैशाच्या संदर्भात तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही भीती किंवा शंकांचे निरसन करू शकतो. कधीकधी आपल्या विपुलतेच्या मार्गात सर्वात मोठी गोष्ट उभी असते ती आपणच असतो, परंतु या स्फटिकाच्या माध्यमातून आपल्याला आठवण करून दिली जाते की आपण विपुलतेला पात्र आहोत आणि ते मिळविण्याची शक्ती आपल्याकडे आहे. स्वतःला विचारा, माझ्या मनाची इच्छा काय आहे? मला कशामुळे उत्कटता येते? मी माझ्या आर्थिक उद्दिष्टांशी माझी आवड कशी संरेखित करू शकतो? मॅलाकाइट तुम्हाला पुढे कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन नक्की देऊ शकते.
3.ब्लॅक टूमलाइन – जर तुम्हाला असे वाटत असेल की नकारात्मक ऊर्जा भरपूर आहे, तर ब्लॅक टूमलाइन हा एक उत्तम पर्याय आहे. तुमचे घर असो किंवा कार्यालय असो, नकारात्मक ऊर्जा साफ करण्यासाठी आणि अधिक सकारात्मक जागा तयार करण्यासाठी हे एक उत्तम स्फटिक आहे. कोणत्याही जागेची ऊर्जा स्वच्छ करण्याची क्षमता असलेले हे स्फटिक संरक्षणासाठी एक शक्तिशाली क्रिस्टल असल्याचे देखील मानले जाते. नकारात्मकता दूर करण्यासाठी ब्लॅक टूमलाइन वापरणे सोपे असू शकते. ते फक्त तुमच्या घराच्या समोरच्या दारापाशी ठेवा किंवा ते तुमच्या घराच्या कानाकोपऱयात पसरवा. तुम्ही ते तुमच्या ऑफिस किंवा वर्कस्पेसमध्ये देखील नेऊ शकता, तुम्हाला तेथे नकारात्मकता आहे असे वाटल्यास. अतिरिक्त संरक्षण आणि सकारात्मकतेसाठी ते तुमच्या डेस्कवर ठेवा. असे बऱयाच प्रकारचे क्रिस्टल्स/स्फटिक वेगवेगळय़ा गोष्टींसाठी वापरले जातात. Pranic Crystal Healing द्वारे योग्य पद्धतीने माहिती घेऊन तुम्ही क्रिस्टल्सचा अभ्यास केलात, वापर केलात तर हे क्रिस्टल तुमच्या दैनंदिन जीवनात चमत्कारिक पद्धतीने बदल घडवू शकतात.
-आज्ञा कोयंडे








