सेन्सेक्स 260 तर निफ्टी 76 अंकांनी तेजीमध्ये
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी भारतीय भांडवली बाजार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंद राहिले होते. या एक दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय शेअर बाजार पुन्हा गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरू राहिला होता. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये बीएसई सेन्सेक्स चढउतारात राहिला असून दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 260 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामुळे गुरुवारी भारतीय बाजारात एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीमध्ये राहिल्याने बीएसई सेन्सेक्स सावरल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 259.62 अंकांसह 053 टक्क्यांच्या मजबुतीसह निर्देशांक 48,803.68 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 76.65 अंकांसोबत 0.53 टक्क्यांसह निर्देशांक 14,581.45 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी सर्वाधिक नफा कमाईत टीसीएसचे समभाग 4 टक्क्यांनी तेजीत राहिले असून यासोबतच ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी आणि एचसीएल टेक यांचे समभाग वाढीमध्ये राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. अन्य कंपन्यांमध्ये मात्र इन्फोसिस, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीत राहिले असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील संचारबंदीचा प्रभाव
चढउताराच्या प्रवासामध्ये देशातील शेअर बाजारात मजबूत स्थिती राहिली असून शेअर बाजारात प्रामुख्याने आर्थिक आणि औषधी कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. परंतु याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या प्रभावामुळे वाहन कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टीसीएस…… 3218
- ओएनजीसी…. 105
- आयसीआयसीआय 575
- एचडीएफसी बँक 1430
- डॉ.रेड्डीज लॅब 4842
- एचडीएफसी. 2543
- ऍक्सिस बँक…. 668
- एचसीएल टेक. 991
- सन फार्मा…… 632
- एनटीपीसी….. 101
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1943
- भारती एअरटेल 539
- स्टेट बँक……… 342
- एशियन पेन्ट्स 2576
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1374
- हिंदुस्थान युनि 2457
- बजाज ऑटो.. 3601
- ग्लेनमार्क…….. 536
- सिप्ला……….. 914
- वेदान्ता………. 225
- अदानी पोर्ट…….. 750
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इन्फोसिस…. 1361
- इंडसइंड बँक… 858
- मारुती सुझुकी 6652
- नेस्ले………. 16871
- बजाज फायनान्स 4650
- अल्ट्राटेक सिमेंट 6537
- आयटीसी……. 206
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 805
- टेक महिंद्रा….. 993
- बजाज फिनसर्व्ह 9747
- पॉवरग्रिड कॉर्प 207
- कोटक महिंद्रा 1772
- टायटन…….. 1530
- ग्रासिम…….. 1340
- अशोक लेलँड… 112
- बंधन बँक……. 326
- बॉश………. 13671
- पेट्रोनेट एलएनजी 221
- बायोकॉन……. 404
- जेएसडब्लू स्टील 628
- पॉवर फायनान्स 109
- बँक ऑफ इंडिया 69
- डीएलएफ……….. 248
- आदित्य बिर्ला फाय 171








