मैत्रिणींनो, स्टार्टर म्हणून वेगळा पदार्थ करायचा असेल किंवा संध्याकाळच्या खाण्याची सोय करायची असेल तर मस्तपैकी पनीर बॉल्स बनवता येतील. हे चटपटीत बॉल्स खवय्यांना नक्कीच आवडतील.
साहित्य : २५० ग्रॅम पनीर, कॉर्न फ्लोर दोन चमचे, दोन उकडलेले बटाटे, थोडी कोथिंबिर, एक कप ब्रेड क्रम्प्स, दोन चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट, एक चमचा लसूण पेस्ट, मीठ आणि तेल.
कृती : पनीर किसून घ्या. उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. कोथिंबिर बारीक चिरून घ्या. आता एका भांड्यात पनीर, कॉर्न फ्लोर, बटाटे, ब्रेड क्रम्प्स, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, कोथिंबिर आणि मीठ घाला. सर्व घटक नीट मिसळून घ्या. आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा. एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात हे गोळे सोडा. सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खा.









