मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागात मोठे नुकसान झाले आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केल्यानंतर २ दिवसांत मदतीची घोषणा करु असे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी मदत जाहीर केली आहे. परंतु अद्याप नागरिकांना मदत मिळालेली नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलनक काढले आहे. यावेळी आंदोलनात ‘पोकळ घोषणा नको तर न्याय हवा, लोकांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
कोकणवासीयांच्या मदतीवरुन दरेकरांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनात सरकारविरोधा निदर्शने करण्यात आली आहेत. उध्वस्त आंबा बागायतदार कोकणाला न्याय मिळाला हवा, पोकळ घोषणा नको प्रत्यक्ष कृती व्हावी, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांन भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.
चक्रीवादळग्रस्त कोकणातील जनतेला केवळ आश्वासन नको, न्याय हवाय! ठाकरे सरकारने आजवर केवळ पोकळ आश्वासने देऊन, कोकणातील जनतेची दिशाभूल केली आहे. कोकणवासीयांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे.








