ट्रक्टर मशागतीचा दर न परवडल्याने केला उपाय
वार्ताहर /हलगा
बस्तवाड, कोंडुसकोप परिसरात एका शेतकऱयाने चक्क दुचाकीने भात मळणी केल्याचा सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले आहे. पूर्वी शेतकरी बैलजोडीने मळणी केल्याचे पहायला मिळत होते. त्यानंतर हळुहळु मशागतीमध्ये सुधारणा झाल्याचे पहायला मिळाल्यानंतर ट्रक्टरच्या साहाय्याने मळणी करण्याचा बेत शेतकऱयांनी आखला. पण सध्या चार-पाच पोत्यांच्या मळणीला पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे दर वाढला आहे. यावर उपाय एका शेतकऱयाने चक्क दुचाकीने भात मळणीचा बेतच आखला आहे. सध्या ट्रक्टरवाले चार-पाच पोत्यांच्या एका मळणीला 500 ते 600 रुपये प्रमाणे दर लावत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा अनेक वैताग आणणारा ठरला असून या काळात समस्यांचे संधीत रुपांतर केले आहे. अन् या अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मधू बांडगी यांनी केलेल्या या प्रयोगाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
आजची युवापिढी वेगवेगळे नवे प्रयोग करताना दिसून येत आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने मळणी हंगाम लांबला होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. तालुक्यात मळणीला चांगला हंगाम आल्यामुळे मळणीच्या शेतीकामासाठी जोर आला आहे.
लॉकडाऊन काळात उपाय म्हणून…
लॉकडाऊन व महागाई हा अनेकांना वैताग आणणारा ठरत आहे. तरी युवकांनी संधीचे रुपांतर साधून जास्तीची तट्टे पगळून कमी जाडीने भात टाकून त्यावर दुचाकी फिरविण्याचा विचार केला आहे. आणि हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









