ईद-उल-फित्रची नमाज घरातच अदा करा, शहर काझी अमजद अली सय्यद यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदसाठी शनिवार 23 मे रोजी चंद्र बघावे जर चंद्रदर्शन झाल्यास रविवार 24 मे रोजी ईद उल फित्र साजरी होईल. मात्र, चंद्रदर्शन न झाल्यास 30 वा उपवास (रोजा) पूर्ण होईल आणि उद्या सोमवार 25 मे रोजी रमजान ईद होईल. त्यामुळे रमजान ईदची नमाज घरातच अदा करा असे आवाहन सोलापूरचे शहर काझी सय्यद अहमदअली निजामी यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी नमाज घरातच अदा करावी. ईदच्या दिवशी शुभेच्छा देताना हात व आलिंगन देऊन नये, यंदाची ईद साधेपणाने करा आणि गरजूंना मदत करा असे आवाहन शहर काझी यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









