इचलकरंजी / प्रतिनिधी
मंडल अधिकारी ,गाव कामगार तलाठी, बांधकाम अभियंता, पोलीस पाटील आदींच्या पंचनाम्याची चौकशी व्हावी.
चंदूर( राकेश पाटील ) सन 2019 मध्ये पंचगंगा नदीस आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे चंदूर गावातील अनेक राहत्या घरांची गोठ्याच्या पूर्णता पडझड झाली होती. सदर महापुरात नुकसानीचे पंचनामे गाव कामगार तलाठी, पंचायत समिती हातकलंगलेचे अभियंता, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, मंडल आधिकारी आदींनी बाधित क्षेत्रास भेट देऊन पंचनामे केले. पण अनेकांची नुकसान भरपाई मिळालीच नाही. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तुमच्या घराचे पंचनामे झालेले आहेत व यादी पाठवली आहे लवकरच नुकसान भरपाई मिळेल असे सांगून अनेकांना त्यावेळी शांत बसवण्यात आले. कालांतराने कोणतीच शासकीय नुकसान भरपाई मिळाली नाही. आम्ही अधिक माहिती घेतला असता मौजे चंदूर येथील काही घरांची काहीही पडझड झालेली नसतानाही त्यांची पूर्णता पडझड म्हणून बेकायदेशीरपणे आर्थिक लाभापोटी खोटी व बनावट पंचनामे करून दिले आहेत व काही लोकांना बेकायदेशीरपणे शासनाची फसवणूक करून लाभ मिळवून दिलेला आहे.
परंतु गावातील अनेकांचे खरोखर नुकसान होऊनही राजकीय द्वेषापोटी व काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून खऱ्या लाभार्थ्यांना लाभांपासून वंचित ठेवून अन्याय करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही हातकलंगले तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकाराखाली सन 2019 मध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे बाबत माहिती मागितली असता तलाठी व इतर अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कृती वाचविण्याच्या उद्देशाने माहिती नाकारली गेली. सदरचे कृती हे कायद्यास धरून नसून शासनाची फसवणूक तर आहेच परंतु आमच्यासारख्या नुकसानग्रस्त नागरिकांचीही फसवणूक आहे याचवेळी पुन्हा काही राजकीय लोकांच्या मागणीमुळे फेर सर्वे केले गेले.परंतु त्यामध्ये ही राजकीय लोकांच्या कार्यकर्त्यांचीच नावे घुसळून खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवले आहे.पूर नियंत्रण रेषेपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर बाहेर राहणाऱ्या काही इसमांची कोणतीही पडझड न होता त्यांचेही खोटे पंचनामे करून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवून दिलेला आहे.
ज्यांचे व्यवसाय नाहीत अशा लोकांचे व्यवसाय आहेत व त्यांचे नुकसान झाले आहे असे खोटे पंचनामे करून आर्थिक लाभ मिळवून देऊन शासनाची फसवणूक केली गेली आहे. व माझ्यासह इतर सोळा तक्रारदाराची घरांची पूर्णता पडझड होऊनही हे नुकसान झाल्यानंतर आम्हापैकी काहींना त्या ठिकाणी आमच्या स्वखर्चाने बांधकाम करून घेतले आहे परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचार्याने आमच्या नुकसानीचे कोणतेही पंचनामे न केल्याने आम्हास शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. सदरची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेले आहे.त्याचबरोबर आम्हास योग्य न्याय मिळाला नाही तर वेळप्रसंगी न्यायालयातही तक्रार दाखल करू.