ऑनलाईन टीम / चंदीगड :
महाराष्ट्र सरकारसोबत वाद झाल्यानंतर अखेर अभिनेत्री कंगना रानौतने सोमवारी मुंबई सोडली आहे. कंगना आज सकाळीच मनालीला जाण्यासाठी निघाले. या दरम्यान कंगनाने चंदीगडला पोहोचून एक ट्विट केले. यामधून तिने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कंगनाच्या मते, मुंबई पहिल्यासारखी सुरक्षित राहिलेली नाही. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे असे कारण दिले आहे.

कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा फक्त नावासाठी राहिली. लोकं आनंदाने मला शुभेच्छा देत आहे. असं वाटतं यावेळी मी वाचले. एक दिवस असा होता जेव्हा मुंबई मातेच्या छत्रछाये खाली अतिशय सुरक्षित वाटायचे. मात्र आज तो दिवस आहे, जीव वाचला तो दिवस लाखमोलाचा. शिवसेना ते सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासनाचा बोलबालाय, असेही तिने यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेत वाद सुरू आहेत. मुंबई संदर्भात आक्षेपार्ह विधान कांगणाने केल्यापासून हे वाद सुरू आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी कंगना ने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली तसेच आपल्याला मुंबईत सुरक्षित वाटत नसून वारंवार धमक्या मिळत असल्याचा आरोप देखील तिने यावेळी केला होता.









