वार्ताहर/कानूर
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बुझवडे (ता. चंदगड) येथील निगाप्पा धोंडीबा कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत घरातील तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटना आज गुरुवार पहाटे चारच्या सुमारास घडली.
निगप्पा कांबळे यांचे विटा सिमेंटचे कौलारू घर आहे. अतिवृष्टीमुळे या घराची भिंत पहाटे अचानक कोसळली. यावेळी घरात झोपले लिंगाप्पा कांबळे (वय 60), द्रोपती निंगाप्पा कांबळे (55) दीपांजली कांबळे (15) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घरांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून तलाठी गोपाळ खूपसे सोमनाथ पवार यांनी पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









