दोडामार्ग / वार्ताहर:
तौक्ते वादळातील नुकसान भरपाईत घोटगे गावावर तहसील कार्यालयाकडून अन्याय झाल्याबद्दल घोटगे गावातील शेतकऱ्यांचे 2 ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा घोटगे येथील भरत दळवी व ग्रामस्थ – शेतकरी यांनी दिला आहे.
सलग तीन वर्षे घोटगे गावाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घोटगे गाव प्रामुख्याने तिलारी नदी काठावरचा गाव आहे. 2019 रोजी आलेल्या पुरात गावातील केळी बागायती सहित इतर बागायती वाहून गेल्या. 2020 मध्ये तौक्ते वादळामुळे केळी बागायती, काजू बागायती, माड बागायती, सुपारी बागायती नष्ट झाल्या. 2021 च्या पुरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पण शासनाने हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु दोडामार्ग तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शासनाचा कोणताही निकष न लावता अल्प नुकसान भरपाई म्हणजेच 1 हजार, 2 हजार, 3 हजार अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तिलारी नदी काठावरच्या गावांना प्रामुख्याने नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे होती. परंतु तिलारी नदी काठावरच्या गावांचा शासनाचे विचार न करता कर्मचारी नुकसान भरपाई देण्याचे काम करत आहेत. गेल्या माहिन्याध्ये गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन नुकसानी बाबत चर्चा केली होती. परंतु शासनाकडून आलेली नुकसान भरपाई सर्व गावांना वितरित केलेली आहे. आता घोटगे गावाला देण्यासारखा जास्त निधी नसून थोडक्यात निधी आपल्याकडे राहिलेला आहे. तो शिल्लक राहिलेला निधी कार्यालयाकडून सर्व 76 शेतकऱ्यांना थोडक्यात वितरित करण्यात आला. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे. यासाठीच तहसिल कार्यालयासमोर भरत दळवी व ग्रामस्थ शेतकरी हे बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
Previous Articleपंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Next Article उमाकांत वारंग कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानीत









