ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले, सोमवारी पहाटे एका दहशतवाद्याने नियंत्रण रेषेच्या पलीकडून पूंछ सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्याला आव्हान दिले, त्यानंतर
झालेल्या गोळीबारात दहशतवादी मारला गेला. त्याच्या ताब्यातील एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.









