पणजी शिमगोत्सवाला नागरिकां अभूतपूर्व प्रतिसाद
प्रतिनिधी/ पणजी
ढोलताशे आणि कासाळ्याच्या एकत्रित वादनाने निर्माण होणाऱया ‘घुमचे कटर घुम’च्या निनादाने पणजी शिमगोत्सव समिती व पर्यटन खात्यातर्फे आयोजित शिमगोत्सवाने शनिवारी राजधानी दणाणली. गोव्यातील लोकसंस्कृती, लोकपरंपरा यांचे प्रतिबिंब जनमानसापर्यंत पोहोचविणाऱया शिमगोत्सवात चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आदींचे दर्शन ठळकपणे झाले. नागरिकां चांगला प्रतिसाद लाभला. शिमगोत्सवाला वेगळा साज चढावा म्हणून शहरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट केली होती.
दरम्यान, पणजी शिमगोत्सव समितीतर्फे पणजी शहरात शनिवारी भव्य मिरवणूक तथा चित्ररथ आणि रोमटामेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत हजारो स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा आणि नेत्रदीपक ािात्ररथांना रसिकांनी मनपूर्वक दाद दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांयाहस्ते मिरवणुकीला प्रारंभ
येथील काकुलो सर्कल समोरील सावरेश्वरच्या देवस्थानकडे संध्याकाळी 4.38 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि देवाला पुष्पहार अर्पण करून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यो पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीपद्धतीनुसार 18 जून रस्त्यावरून फार्मसी कॉलेजमार्गे चर्च चौक आणि शेवटी आझाद मैदानावर या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
अनेक पथकांचा समावेश
गोव्याच्या विविध भागातून अनेक पथके स्पर्धेत सहभागी झाली होती. रोमाटमेळ 8, वेशभूषा स्पर्धेत ज्येष्ठ विभागात 19 ज्येष्ठ, तर कनिष्ठ विभागात 47 तर 17 चित्ररथ सहभागी झाले होते. लोककला नृत्य विभागातही अनेक पथकांनी भाग घेतला होता. मोरूलो, धनगर नृत्य, मुसळनृत्य, घोडेमोडणी तसेच इतर विविध पारंपरिक नृत्यांचा उपस्थित रसिकांनी आनंद लुटला. प्रत्येक मेळात सर्व वयोगटातील कलाकारां सहभाग होता. प्रत्येजण देहभान विसरून बेफामपणे नाचत होते. वास्को येथील महिलांचा रोमटामेळ उपस्थित रसिकांचे लक्ष वेधून घेत होता. या मेळात 100 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
वेळो बंधन पाळण्यायादृष्टीने आयोजकीं कृती
मिरवणुकीच्या प्रारंभी मेरशी येथील माने ग्रुपचे बँड पथक, त्यानंतर धारबांदोडा येथील ढोलताशे मेळ होता. त्यांच्या मागोमाग स्पर्धेत सहभागी झालेला वास्को येथील रोमटामेळ व त्यांच्या मागोमाग तीन लोकनृत्य पथकांनी आपली कला सादर केली. काही रोमटामेळांनी वेळेचे बंधन न पाळल्यामुळे त्यांना मागे ठेवून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात करण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला. या कामात पोलिसांनीही आपली भूमिका योग्यपणे पार पाडली. उााा न्यायालयाच्या आदेशानुसार वेळेचे बंधन पाळणे जरूरीचे होते म्हणून याबाबत आयोजक गंभीर होते व त्यासंबंधी कृती करत होते.
नेत्रदीपक चित्ररथांनी डोळय़ो पारणे फेडले
वर्षभर मेहनत करून कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती चित्ररथ मिरवणुकीत पाहायला मिळाल्या. सुमारे 17 हून अधिक चित्ररथ होते मिरवणुकीत होते. जालंधराकडून शिवगणांचा छळ, नरसिंह देखावा, सहस्त्र अर्जुन रावणयुध्द, महादेवांची स्वारी, महादेव-त्रिपुरासूर य्द्धु आदी नेत्रदीपक आणि भव्य पौराणिक विषयावरील चित्ररथांनी हजारो रसिकांया डोळयो पारणे फेडले.
वेशभूषा स्पर्धेला बालगोपाळीं दाद
वैयक्तिक वेशभूषा स्पर्धेत वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यातील अनेक वेशभूषाकारांनी रसिकों मनोरंजन केले. यात वीरभद्र मारुती, नरसिंह, कालीमाता, साईबाबा, राम आदी भूमिकेतील कलाकारांनी बालगोपाळों लक्ष वेधले.









