प्रतिनिधी / घुणकी
घुणकी येथील गावानजीकच्या ओढ्याजवळ ट्रक्टरने ठोकरल्याने एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. धनाजी कृष्णा पाटील (वय.५६)असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून शशिकांत मारुती नाईक (वय.५६ दोघेही रा.घुणकी) असे जखमीचे नाव आहे.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी- सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान धनाजी कृष्णा पाटील, शशिकांत नाईक हे शेतातून वैरण घेऊन गावात येत होते. समोरुन आलेल्या ट्रक्टरने धनाजी पाटील, शशिकांत नाईक यांना ठोकरले. यामध्ये धनाजी पाटील, शशिकांत नाईक जखमी झाले. दोहोना पेठवडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता धनाजी पाटील मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ज्योती कांबळे यांनी उत्तरीय तपासणी केली. शशिकांत नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहाय्यक फौजदार सतीश कुंभार अधिक तपास करीत आहेत.
धनाजी पाटील यांच्या मागे आई, तीन भाऊ, पत्नी, मुलगा असा परीवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.३) सकाळी ८ वाजता घुणकी येथे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









