प्रतिनिधी/कास
जागतिक वारसास्थळ कास पठारच्या पुर्वेला असणाऱ्या घाटाई रोडवरील चार गावांना जोडणाऱ्या घाटाई फाटा ते कास मार्गाचे रुंदीकरण डांबरीकरण करूण दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात आणुन पर्यटन वाढीला तात्काळ चालना दया आशी मागणी चार गावातील नागरीकासह परिसरातील जनतेतून व्यक्त होत आहे.
देश स्वतंत्र्य होवुन सत्तर वर्षाहुन आधीक काळ ऊलटला तरी जागतीक वारसास्थळाच्या कुशीत वसलेल्या कासाणी, घाटवण, जांभळेघर, वाजंळवाडी आदी गावे दळवळणाच्या मुख्यप्रवाहात आली नसुन त्यांना दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी घाटाई फाटा (चोर टाका ) ते वाजंळवाडी कास हा मार्गाचे डांबरीकरण करुण मजबुतीकरण तात्काळ झाल्यास स्थानिक जनता दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात येवुन पर्यटनाच्या माध्यमातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवुन पर्यटन वाढीला मोठया प्रमाणात चालना मिळणार आहे.
कास पठार वरून बामणोली कडे मुख्य रस्ता जात असल्याने चार गावे मुख्य दळणवळणापासुन अदयाप वंचित आहेत या भागातील पर्यटनही रसत्याविना विकासापासुन वंचित आहे या परिसरात पर्यटनाला मोठा वाव असुन या रसत्याच्या दुतर्फा जंगल झाडी असुन या रोडवरून सञ्जनगड उरमोडी जलाशयाचे संपर्ण विहंगमय दृक्ष्य लाखो भविकांचे श्रद्धास्थान घाटाई देवीचे भव्य मंदीर व मंदीर परिसरात असणारी घनदाट वनराई वाजंळवाडी परिसरातुन वजराई धबधब्याचे दर्शन परळी खोऱ्यातील हिरव्यागार सजलेल्या डोगंररांगा ठोसेघर परिसरातील पवनचक्की असे अनेक पर्यटनस्थळांचे या रोडवरून दर्शन होत असुन पर्यटनासाठी हा परिसर नवे दालन ठरणार असुन रोड झाल्यास पर्यटनाची अनेक दालने खुली होणार आहेत त्यामुळे घाटाई मार्गाला कास सातारा रोडला दोन्ही बाजुने जोडणे गरजेचे आहे.
जागतीक वारसास्थळ कास पठार या पठार वरील फुलांचा हंगामा पाहण्यासाठी पठारवर दररोज हजारो पर्यटक येत असतात त्यामुळे पठार वर पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक कोंडी होते तर एकाच वेळी शेकडो वाहने निसर्गसंपन्न परिसरात एकत्र आल्यास प्रदुषणाचा विषय निर्माण होतो त्यामुळे कास पठार ला तात्काळ पर्यायी मार्गाची गरज असुन यासाठी घाटाई मार्ग पर्यायी वाहतुकी साठी म्हत्वाची भुमीका बजावणार असुन कास पठारवरील वाहतुक कोंडी फुटणार आहे
कास पठार वरून बामणोलीकडे मुख्य वाहतुक सुरु असल्याने व घाटाई मार्गाचे संपुर्ण डांबरीकरण अदयाप न झाल्याने आमची चार गावे विकासापासुन वंचीत आहेत चार गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात अणण्यासाठी घाटाई मार्गाला कास फाटा वाजळंवाडी ते घाटाई फाटा जोडणे गरजेचे असुन ही मागणी धनिकांची नसुन स्थानिकांची आहे.- जयराम काळे(घाटवण ग्रामस्थ)
घाटाई रोड लगत पर्यटनाचे मोठे दालन असुन घाटाई कास मार्ग जोडल्यास व या मार्गावरून मुख्य वाहतुक सुरु झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन चार गावे दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात येतील रस्ता जोडणे ही मागणी पुर्वीचीच असुन त्यानुसार रोडचे काम सुरु आहे ते पुर्ण झालेच पाहिजे.- प्रकाश बादापुरे(कासाणी ग्रामस्थ)