ऑनलाईन टीम / मुंबई :
मानखुर्द – घाटकोपर लिंक रोडवरील एका स्क्रॅप गोदामाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनस्थळी झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या गोदामात तेलाचे ड्रम ठेवण्यात आलेले होते. यामुळे आगीने भीषण स्वरुप धारण केले. हे गोदाम जवळपास 15 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना फायर ब्रिगेडचे अधिकारी डिप्टी सीएफओ वाय आर जाधव यांनी सांगितले की, वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत आहे.
घटनास्थळी 6 फायर इंजीन आणि फोम टेंडर दाखल झालेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.









