सेन्सेक्स 1028.49 तर निफ्टी 316.65 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजारात घसरणीचे सत्र होते, परंतु दुसऱया दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी बाजार सुरु झाल्यावर 854.62 अंकानी तेजीत राहिला होता, तर निफ्टी 248.25 अंकानी वधारल्याचे पहावयास मिळाले होते. ही तेजी बाजार बंद होईपर्यंत पहावयास मिळाली. दिवसअखेर सेन्सेक्सने 1028.49 अंकानी वधारुन निर्देशांक 29,468.49 वर बंद झाला दुसऱया बाजूला दिवसअखेर निफ्टी 316.65 अंकानी वधारुन 8,597.75 वर निर्देशांक बंद झाला आहे.
सध्या भारतासोबत जगातील बाजारापेठा ठप्प झाल्या आहेत. यामुळे विविध अभ्यास संस्थाकडून जगासोबत देशातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीचे आकडे सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते काही प्रमाणात गोंधळलेलेही असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यातच दिलासा दायक बाब म्हणजे भारतीय केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीचे विविध उपाय राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा लाभ भारतीय शेअर बाजाराला होत असल्याचे म्हटले आहे. दिवसभरातील व्यवहारात ऑईल गॅस क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम 13.20, भारत पेट्रोलियम 12.34, गेल 6.91, रिलायन्स 6.46, ओएनजीसी 6.15, कॅस्ट्रोल इंडिया 5.30 आणि पेट्रोनेट एलएनजीचे समभाग 5.23 टक्क्मयांनी वधारले आहेत. आजच्या कामगिरीमुळे आगामी काही दिवस बाजारात सकारात्मक वातावरण राहण्याचे अनुमान अभ्यासकांकडून मांडले जात आहे.
तेजीची प्रमुख कारणे
विविध रेटिंग संस्थेच्या अहवालात कोरोनातूनही भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याचे नोंदवले अनुमान जी20 देशाच्या तुलनेत भारत कोरोनाला सकारात्मक टक्कर देण्याचे भाकीत केंद्राने लॉकडाउनची घोषणा करताना केल्यामुळे, सकारात्मक परिणाम शेअरबाजारांवर झाल्याचे स्पष्ट झाले.







