पांढरे केस काळे करण्यासाठी डायचा वापर होतो. पण या डायमधल्या घातक रासायनिक घटकांमुळे केसांचं बरंच नुकसान होतं. म्हणूनच केस काळे करण्यासाठी नैसर्गिक डायचा वापर करता येईल. तुरटी आणि चहा पावडरचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता. यासाठी दोन चमचे चहा पावडर मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पूड बाजूला ठेवा. आता एका कढईत दोन चमचे चहा पावडर काळी होईपर्यंत भाजून घ्या. ही पावडरही वाटून घ्या. आता एका भांडय़ात पाणी गरम करा. त्यात दोन चमचे चहा पावडर घालून उकळून घ्या. 10 ते 15 मिनिटांनी गॅस बंद करा. चहाचं पाणी गाळून घ्या. या पाण्यात चमचाभर वाटलेली चहा पावडर आणि एक चमचा भाजून वाटलेली चहा पावडर घाला. या मिश्रणात थोडं पाणी घालून उकळून घ्या. थंड करायला ठेवा. या मिश्रणात चमचाभर तुरटी घाला. यानंतर हे मिश्रण ब्रश किंवा कापसाने पांढर्या केसांवर लावा. हे मिश्रण अर्धा तास ठेवल्यास केसांचा रंग तपकिरी होईल. काळेभोर केस हवे असतील तर तासाभराने धुवा. या नैसर्गिक डायमुळे केस मजबूत होतील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









