आंदोलन करत जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढविली म्हणून अजिम पटवेगार आणि त्यांच्या समर्थकांनी आमच्या घरावर हल्ला करून घराची मोडतोड केली. याचबरोबर आम्हाला तसेच आमच्या कुटुंबीयांना मारहाण केली. मात्र, अजूनही अजिम पटवेगार यांना अटक करण्यात आली नाही. त्या विरोधात त्या महिलेसह इतर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून कारवाई करण्याबाबत निवेदन दिले.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सलीमा गोकाकवाले यांनी निवडणूक लढविली. तुझ्यामुळे आमचा पराभव झाला आहे म्हणून शिवीगाळ करून अजिम पटवेगार आणि इतरांनी आमच्या घरावर हल्ला केला. यावेळी माझ्यासह आमच्या घरातील सर्व कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. मार्केट पोलीस स्थानकामध्ये खुनी हल्ला प्रकरण दाखल झाले आहे. मात्र, अजून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली नाही, असे या महिलांनी निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सलीमा गोकाकवाले, एच. ए. मकानदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.









