हरमल वार्ताहर
मधलावाडा तिठा येथे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून अंदाजे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
काल सकाळी 8 च्या सुमारास तिठा येथील संदीप गावडे यांच्या घरानजीक असलेले हापूस आंब्याचे झाड मुळापासून अलग होत,आंबा फळासह घराच्या छपरावर कोसळले व कौले तसेच लाकडी इमारती साहित्याची नुकसानी झाली.अंदाजे 200 कौले व इमारती लाकूड मिळून दहा हजाराचे नुकसान झाले.
सदर इमारतीत आयुर्वेदिक दवाखाना असून त्यात डॉक्टर नाईक यांच्या कुटुंबियांचे वास्तव्य होते.झाड कोसळले तेव्हा सर्व मंडळी आतील खोलीत होती.
यंदा,हापूस फळांची लागवड चांगल्याप्रकारे झाली होती व येत्या आठ दहा दिवसांत कच्ची फळे उतरवून घेण्याचे ठरले होते, असे संदीप गावडे यांनी सांगितले.ह्या अचानक पडझडीमुळे 700 -800 फळांची अंदाजे वीस ते तीस हजार रुपयांचे नुकसान झाले.फळांच्या वजनाने झाडांच्या फांद्या पूर्णत छपरावर कलंडलेल्या होत्या. पेडणे अग्निशमन दलाच्या अधिकारी दिलीप गवस व जवानांनी चांगले काम केले.
पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गवस व तसेच वरि÷ अधिकारी जे. बी. नाईक,डी. बी. बाबरेकर,एस. ऐ. चोडणकर,एन. पी. साळगावकर,ऐ. ई. नाईक व ऐ. एस. सावळ ह्या जवानांनी चांगले काम केले.









