प्रतिनिधी / कुर्डुवाडी
घरात घुसून मारहाण करत वृद्धाला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा जणांवर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना कुर्डू ता.माढा येथे घडली.याबाबत पोपट श्रीरंग जगताप वय ६२ रा. कुर्डू यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बाळू विष्णू जगताप , बापूसाहेब विष्णू जगताप , हरिदास निंबा जगताप , कुमार हरिदास जगताप , मंगेश हरिदास जगताप , सौरभ चंद्रकांत जगताप व इतर अनोळखी चार सर्व राहणार कुर्डू तालुका माढा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील सहा व इतर चार लोकांनी मिळून संगनमताने गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत घरात घुसून साहित्याची, तसेच मोटरसायकल चे नुकसान केले व फिर्यादीला लोखंडी पाईप ने व लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.तसेच फिर्यादीची तीन तोळे सोने व काही रोख रक्कम गहाळ झाले आहे.









