चीनमधील या प्रकारामागील कारण विचित्र
चीनमधून अनेकदा असे काही समोर येते की ते ऐकल्यावरच अनेकदा हैराण व्हायला होते. विशेषकरून कोरोना संकटानंतर जगभराच्या नजरा चीनच्या हालचालींवर केंद्रीत झाल्या आहेत. सध्या तेथील मुले हेल्मेट घातलेली दिसून येत आहेत. एवढेच नाही तर स्वतःच्या घरातही ही मुले हेल्मेट घालूनच वावरत आहेत.
ही मुले स्वतःच्या मर्जीने नव्हे पालकांकडून त्यांना पूर्ण दिवस हेल्मेट घालण्यासाठी भाग पाडले जात आहे. पालक अखेर मुलांसोबत असे का करत आहेत हा प्रश्न उपस्थित होते. ही हेल्मेट्स आपल्या मुलांच्या डोक्याला गोल आकार देतील, ज्यामुळे ती सुंदर दिसू लागतील असे या आईवडिलांना वाटते.
चीनमध्ये एकप्रकारे मुलांना ही हेल्मेट्स घालायल लावणे हा ट्रेंड झाला आहे. लोक या टेंडला फॉलो करत आहेत. यात मुलांच्या डोक्याला आकार देण्याच्या दृष्टीने या हेल्मेट्सची विशेष निर्मिती करण्यात आली आहे. पण या हेल्मेट्समुळे या मुलांना किती त्रास होतोय ही बाब मात्र समोर आलेली नाही.

कंपन्यांना लाभ
या ट्रेंटडमुळे कंपन्यांनाही फायदा होत आहे. हेड करेक्शनसाठी तयार करण्यात आलेली अनेक प्रकारची उत्पादने चीनमधील बाजारात येत आहेत. मुलांचे डोके चपटय़ा आकाराचे होऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे.
3 लाख रुपयांचे हेल्मेट
या हेल्मेटची किंमत 3 लाख रुपये आहे. याचे एक स्वस्त व्हर्जन देखील बाजारात उपलब्ध आहे. बहुतांश महिला स्वतःच्या मुलींसाठी हेल्मेट खरेदी करत आहेत. 3 महिन्यांचे वय असलेल्या मुलांना हे हेल्मेट घातले जाते, सुमारे 1 महिन्याच्या आसपास याचे परिणाम दिसू लागत असल्याचे बोलले जाते.









