जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
येत्या दि. 21 जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रत्येकाने घरीच साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. कोविड-19 च्या नियमानुसार सार्वजनिक सभा, समारंभ यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा योग दिनसुद्धा ‘बी विथ योगा, बी ऍट होम’ या घोषवाक्मयानुसार घरात साजरा करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
योग प्रात्यक्षिक किंवा योगचा सराव हा ऑनलाईन माध्यमातूनच करावा, तसेच सरकारी पातळीवर होणारा योग दिन युटय़ुबच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक देण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे व योग दिन साजरा करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.









