घर घेतल्यानंतर त्याची सजावट हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आपली गृहसजावट इतरांपेक्षा वेगळी असावी असं तुम्हाला वाटतं का, घराला अँटीक आणि हटके लूक मिळावा असा तुमचा प्रयत्न आहे का… मग या शॉपिंग टिप्स खास तुमच्यासाठीच आहेत.
- घरासाठी लायटिंग लॅम्प्स तसंच हटके बल्बची निवड करणं हे मोठं आव्हान असतं. अशा बल्बमुळे घराला एक वेगळाच लूक येतो. घरासाठी दिवे किंवा बल्ब घेण्याच्या विचारात असाल तर काही अँटीक स्टोअर्सना भेट द्या. शहरात अँटीक वस्तू मिळणार्या बाजारपेठा असतात. या बाजारपेठांमध्ये तुम्हाला काहीतरी हटके मिळून जाईल. लायटिंगसाठी विंटेज पर्यायांची निवड करत असाल तर 100 वॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे बल्ब घेऊ नका.
- एखादा लेदर सोफा तुमच्या घराची शान वाढवू शकतो. असा सोफा खरेदी करण्यासाठी तुम्हाला विंटेज मार्केटमध्ये जावं लागेल. तसंच तुमचा लेदर सोफा बनावट नसल्याची खात्री करून घ्या. तसंच तो विंटेज लेदरपासून तयार केलेला असेल तर तुम्हाला अपेक्षित लूक मिळू शकेल.
- प्रत्येकाच्या घरात खुर्च्या असतात. पण तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल तर कुशन्ड किंवा अपहोल्डस्टर फर्निचरची निवड करता येईल.
- घरासाठी अँटिक किंवा हातमागावरील रग खरेदी करा. असे रग कधीही आउट ऑफ फॅशन होत नाहीत. विंटेज स्टोअरमध्ये असे रग मिळू शकतील.
- भिंतींच्या सजावटीसाठी आकर्षक आणि हटके पेंटिंग्ज खरेदी करायला हरकत नाही. अशी पेंटिंग्ज एखाद्या प्रदर्शनात किंवा विंटेज दुकानात मिळू शकतात.