स्ट्रेट केस कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटवर सूट करतात. साधारणपणे केस स्ट्रेट करण्यासाठी महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण काही महिलांना केमिकलच्या वापराने केसासंबंधी वेगवेगळय़ा समस्या येतात. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर तुम्ही घरच्या घरीच केस स्ट्रेट करू शकता. त्यातल्या त्यात हे उपाय नैसर्गिक असल्याने याचे काही साईड इफेक्टही नाहीत.
केस स्ट्रेट करण्यासाठी कोमट तेल फायदेशीर ठरते. रोज केसांना तेल लावल्याने केस सरळ होतात. खोबऱयाचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तेल थोड गरम करावे. नंतर केसांना लावून 15 ते 20 मिनिटे मसाज करावा. साधारण अर्ध्या तासाने एखाद्या माईल्ड शॅम्पूने केस धुवावे.
मुलतानी मातीचा वापर पूर्वीपासून होतो आहे. याने केस नैसर्गिकपणे स्ट्रेट होतात. यासाठी मुलतानी मातीमध्ये अंडय़ांचा पांढरा भाग मिश्रित करावा. त्यात थोडे तांदळाचे पीठही घालावे. याची एक घट्ट पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावावी. त्यावरून मोठय़ा दातांचा कंगवा फिरवावा. त्यानंतर एका तासाने केस स्वच्छ करावे. यावर दुधाचा स्प्रे करावा. 15 मिनिटे दूध तसेच राहू द्यावे. काही वेळात केस स्ट्रेट होऊ लागतील.
कोकोनट मिल्क, लेमन ज्यूस एका वाटीमध्ये व्यवस्थित मिश्रित करून काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवावा. नंतर हे मिश्रण केसांवर मास्कसारखे लावावे. साधारण 15 ते 20 मिनिटांनी केसांना स्टीम द्यावी. नंतर केस एखाद्या चांगल्या किंवा तुम्ही नेहमी वापरत्या त्या शॅम्पूने धुवावेत. केस सुकल्यानंतर स्ट्रेट होतील तसेच केस चमकदारही होतील.
बेसन, मुलतानी माती आणि ऍपल व्हिनेगरचे मिश्रण तयार करावे. ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे केसांना लावून ठेवावी आणि नंतर केस शॅम्पूने धुवावे. केस स्ट्रेट होतील.
प्रज्ञा मणेरीकर









