माळशिरस / प्रतिनिधी
घरकुलाचा पाचवा हप्ता मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी करून अठराशे रुपयाची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी सहाय्यकास सोलापूरच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांच्या बहिणीला प्रधानमंत्री आवास योजना सन २०१८ २०१९ घरकुल मंजूर झाले होते. त्यांनी घराचे कामही पूर्ण केले आहे .त्यांना या घरकुलाचे चार हप्ते मिळाले आहेत. सदरचा हप्ता लाभार्थ्यास मिळण्याकरिता ग्रामपंचायतीने अहवाल देखील सदर केला. परंतु गट विकास अधिकारी कार्यालय माळशिरस, अंतर्गत बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे यांनी बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला देणेसाठी २ हजार रुपयाची मागणी केली. याबाबत तक्रारदर यांनी सोलापूर एसीबी कडे दाखल केली.
सदरची पडताळणी केली असता लाचेची मागणी करून १८०० लाच स्वीकारताना सुहास शिंदे यास रंगेहात पकडण्यात आले .सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ,पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि श्रीमती कविता मुसळे, चंद्रकांत पवार, अतुल घाडगे ,सनके ,सुरवसे .या पथकाने केली
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









