नैऋत्य रेल्वे विभागात पहिलाच प्रयोग
प्रतिनिधी/ बेळगाव
नैऋत्य रेल्वेने आपल्या विभागामध्ये रेल्वे मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहेत. घटप्रभा व चिकोडी विभागात या नव्या मार्गामुळे रेल्वेच्या गतीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास कमी वेळेत होणार आहे.
या मार्गावर चाचणी घेताना ताशी 120 ते 124 गती नोंदविण्यात आली आहे. ताशी 70 ते 80 कि. मी. असणारी गती आता 110 च्या पुढे गेली आहे. या वाढलेल्या गतीमुळे रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. रेल्वेचे मुख्य अभियंता विनोद बंपल यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे. सर्वत्या खबरदारी घेऊनच रेल्वेची गती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.









