न्यूयॉर्क
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या जागतिक नेत्यांना मागे टाकत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल’ रेटिंग यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. अमेरिकन रिसर्च फर्म मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 72 टक्के रेटिंगसह ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल’मध्ये अव्वल ठरले आहेत. ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल’मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे 41 टक्के रेटिंगसह जगातील सर्वोच्च नेत्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 35 टक्के रेटिंगसह 12 व्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना केवळ 30 टक्के गुणांकन प्राप्त झाल्याने ते बरेच पिछाडीवर पडले आहेत.









