वेळापत्रक, नाविन्यपूर्ण गुण पद्धती जाहीर, मिश्र संघांत पुरुष, महिला व 21 वर्षांखालील खेळाडूंचा समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
ग्लोबल चेस लीगच्या शुभारंभी स्पर्धेपूर्वी त्याचे वेळापत्रक आणि गुणप्रणाली जाहीर करण्यात आली असून दुबई क्रीडा मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा दुबईत 21 जूनपासून 2 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे. बुद्धिबळाच्या खेळाला फ्रँचायझी स्वरूपाची ओळख करून देणारी ही लीग असून पूर्णपणे नवीन अशा मिश्र-संघ स्वरूपात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या मिश्ा़dर संघांत पुऊष, महिला आणि 21 वर्षांखालील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश राहणार आहे.
प्रत्येक संघात सहा खेळाडू आणि एक व्यवस्थापक असतील. सदर खेळाडू एकाच वेळी खेळविल्या जाणाऱ्या सहा पटांवर खेळतील. प्रत्येक पटाला एक ‘गेम’ म्हटले जाईल, तर सर्व सहा पटांना एकत्रित जमेस धरून एक सामना म्हटले जाईल. पटांचा क्रम ठरवताना चिठ्ठ्या काढल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही आणि प्रत्येक सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू एकाच रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळतील.
काळ्या रंगाच्या सोंगाट्यासह गेम जिंकल्यास विजेत्या खेळाडूला 4 गेम पॉइंट्स, पांढऱ्या सेंगाट्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूचा विजय झाल्यास त्याला 3 गेम पॉइंट्स आणि बरोबरीसाठी 1 गेम पॉइंट दिला जाईल, आणि पराभवामुळे खेळाडू ध् उझ् मिळेल. संघाचे एकूण मॅच पॉइंट्स ठरविताना प्रत्येक खेळाडूचा गेम पॉइंट जमेस धरला जाईल. एखाद्या संघाने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गेम पॉइंट्स मिळविल्यास त्याला 3 बोनस गुण दिले जातील. जर गेम पॉइंट्सच्या बाबतीत दोन्ही संघ बरोबरीत राहिले, तर त्यांना प्रत्येकी 1 बोनस गुण दिला जाईल.
अंतिम फेरी ही दोन सामन्यांची असेल. पहिल्या सामन्यात कोणत्या संघाने पांढऱ्या सेंगाट्या घेऊन खेळावे हे निर्धारित करण्यासाठी चिठ्ठ्या काढल्या जातील. हा संघ मग दुसऱ्या सामन्यामध्ये काळ्या सोंगाट्या घेऊन खेळेल. जो संघ अधिक सामने जिंकेल तो विजेता बनेल. टाय झाल्यास ‘प्लेऑफ ब्लिट्झ’ सामना खेळविला जाईल. त्यातही दोन लढतींचा समावेश असेल. पहिल्या सामन्यामध्ये पांढऱ्या सोंगाट्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये काळ्या सोंगाट घेऊन खेळलेला संघ तिसऱ्या सामन्यात पांढऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये काळ्या सोंगाट्या घेऊन खेळेल. प्रत्येक लढतीची वेळ मर्यादा 3 मिनिटे अधिक 2 सेकंद अशी असेल. जो संघ सर्वांत जास्त सामने जिंकेल तो विजेता बनेल.
जर तरीही संघ बरोबरीत राहिले, तर चिठ्ठ्या काढून 1 ते 6 पर्यंतच्या पटांची रचना ठरविली जाईल. प्रत्येक संघातील खेळाडू या पटांवर ‘प्लेऑफ ब्लिट्झ’ गेम खेळेल. प्रत्येक लढतीची वेळ मर्यादा 3 मिनिटे अधिक 2 सेकंद अशी असेल. विजेता ठरेपर्यंत ही फेरी चालेल.









