ऑनलाईन टीम
जगातील विविध देशांना लसींचा पुरवठा करण्यात भारत आघाडीवर आहे. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच देशाचे कौतुक केले आहे. देशात लसीकरण सुरु असतानाच भारताने इतर देशांनाही लसीकरणासाठी मदतीचा हात दिला आहे. यामुळे देशभरात भारताचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे.
आज पुन्हा एकदा याचीच प्रचिती आली आहे. ग्रेटर टोरोंटो क्षेत्रात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर कॅनडाला कोविड-१९ लसीचा पुरवठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत. गेल्या आठवड्यात भारताने कॅनडाला कोविशिल्ड लसींचे ५ लाख डोस पाठवले, कॅनेडियन भागीदार व्हॅरिटी फार्मास्युटिकल्सकडे हा माल पाठवण्यात आला.
भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ट आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत बायोटेक या दोन लसींच्या निर्मितीस जानेवारीत मान्यता दिली होती. यानंतर देशात लसीकरणास सुरुवात झाली. देशात आतापर्यंत २.३ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









