फिरोज मुलाणी / औंध :
मेघा फूड पार्कमध्ये महिला कुस्तीगीरांच्या चुरशीच्या लढतीमुळे आखाड्यातील रंगत वाढली आहे. आज बुधवारी ग्रीकोरोमन प्रकारात पुरुष मल्ल परस्पराशी भिडणार आहेत.
24 वी पुरुष ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आज मेघा फूट पार्क सातारा येथे होणार आहेत. निकाळजे ट्रांन्स, बीव्हीजी ग्रुप एनबी ग्रुप यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अगोदरच कुस्तीशौकीनांना घरबसल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील चुरशीच्या लढतीचा आनंद घेता आल्याने कुस्तीशौकिन समाधानी आहेत. राज्यभरातील जिल्हा आणि शहर तालिम संघतील 316 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 55 कि., 60 कि, 63कि, 67कि, 72कि, 77कि, 82कि, 87कि, 97कि, 130 किलो वजनगटात ही स्पर्धा होणार आहे. अनेक दिग्गज आणि अनुभवी मल्ल राज्यस्तरीय अजिंक्यपदासाठी आखाडय़ात झुंजणार आहेत. या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे तमाम कुस्तीशौकीनांच्या नजरा लागल्या आहेत.
कशी असते ग्रीकोरोमन कुस्ती
कुस्तीमध्ये ग्रीकोरोमन प्रकार आहे. या प्रकारात दोन प्रतिस्पर्धी मल्ल लढताना फक्त कमरेच्या वर डाव करता येतात. बचावासाठी किंवा आक्रमणासाठी पायाचा उपयोग करता येत नाही. भारंदाज, धोबी प्रंट साल्तो, बँक साल्तो आदी डावाचा प्रभावी वापर करून मल्ल गुण मिळवतात.
या गटातील लढती होणार प्रेक्षणीय
समीर देसाई कोल्हापूर (130 किलो), संदेश भगत कल्याण, बापू कोळेकर (60 किलो), रवींद्र शेळके मुंबई, शेख साजिद शेख अब्दुल औ.बाद, सौरभ सव्वाशे सांगली (97 किलो),केवल भिंगारे नगर, नवनाथ राक्षे पुणे (87 किलो), अमोल नरळे 82 किलो, गोकुळ यादव मुंबई (77 किलो),विक्रम कुर्हाडे कोल्हापूर (63 किलो), जयदीप बडरे मुंबई (55किलो)









