दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची मागणी
दोडामार्ग / वार्ताहर:
ग्रा. पं. पातळीवरील वैयक्तिक शासकीय योजनेसाठी ज्या जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या शिथिल कराव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग दोडामार्ग तालुकाध्यक्ष गोविंद कदम यांनी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना दिले आहे.याबाबत निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत पातळीवर शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना जारी केल्या जातात. उदा. घरदुरुस्ती, झेरॉक्स मशिन, इ. यांना अनुसुचित जातीचा दाखला अनिवार्य आहे. शासनाच्या दाखल्यांसदर्भात जाचक अटी असल्यामुळे काही लोक किंवा लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे या जाचक अटी शिथील करुन सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील व तलाठी यांचा संयुक्त दाखला ग्राह्य धरून योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा. जेणेकरून कोणीही शासकिय योजनांपासुन वंचित राहणार नाही. त्यामुळे याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गोविंद कदम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दिपक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नवराज कांबळे, दोडामार्ग शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर यांनी केली आहे.