ओटवणे /प्रतिनिधी-
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदूर्ग यांचे कार्यालयासमोर
महाराष्ट राज्य ग्रामिण ग्रा. पं. कर्मचारी संघटनेने येत्या १५ ऑगस्ट रोजी १ दिवशीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी यांनी ग्रा. पं. कर्मचार्या मागण्या संदर्भात ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग तसेच सर्व गट विकास अधिकार्यांना निर्देश दिल्याचे सांगुन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु ग्रा. प. कर्मचार्यांचे तक्रार व समस्यांचे थेट निवारण करण्याचा अधिकार सामान्य प्रशासनाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाने दिलेला नाही.
तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या पत्रावर ग्रामपंचायत कर्मचारी संघटना समाधानी नाही. त्यामुळे केवळ संघटनेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून मुख्य कार्यकारी प्रजित नायर यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळीच आवरावे असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिलेला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या उपोषणावर संघटना ठाम असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर व सचिव. सूहास बांबार्ङेकर यांनी कळविले आहे.









