युपीआय-डिजिटल वॉलेटची लोकप्रियता वाढीस : बीएफएसआय 2020 च्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वर्ष 2020 मध्ये ग्राहकांच्या सेवेत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक (एसबीआय) हे अव्वलस्थानी राहिले आहेत. तसेच दुसरीकडे गुगलपे आणि फोन पेचा आघाडीच्या वॉलेटमध्ये समावेश राहिला आहे. सास स्टार्टअप विजिकीच्या बीएफएसआय मूव्हर्स ऍण्ड शेकर्स 2020 च्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्सला बीएफएसआय म्हटले जाते. सदर अहवालामध्ये देशातील पहिल्या 100 बँका, वॉलेट, युपीआय, नियोबँक्स, नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीज (एनबीएफसी), स्मॉल फायनान्स बँक्स आणि पेमेंट बँक्स यांचा समावेश असतो.
यंदा इन्शुरन्स किंवा विमा क्षेत्राला अच्छे दिन आल्याचे दिसले आहे. कोरोनामुळे आरोग्य विम्याचे महत्त्व वाढले असून याचे ग्राहकही वाढल्याचे दिसले आहे. विमा क्षेत्राची चलती दरम्यानच्या काळात दिसली होती.
गुगलपे नंबर वन
कोरोना काळात डिजिटल व्यवहारांना जास्त गती प्राप्त करता आली आहे. अनेकांनी ऑनलाइन पेमेंट करण्यावर भर दिला होता. युपीआय आणि वॉलेटच्या माध्यमातून दरम्यानच्या काळात व्यवहार मोठय़ा प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. या योगे नवे ग्राहक जोडण्याची संधी अनेकांना उपलब्ध झाली होती. लॉकडाऊनच्या काळात या व्यवहारात सर्वात आघाडीवर राहिली ती गुगलपे. मुव्हर अँड शेकरच्या यादीत गुगलपेने अव्वलता प्राप्त केली होती. यानंतर फोनपेचा नंबर होता. यामध्ये आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआय यांच्या युपीआय व्यवहाराला ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. ऍक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी तीन बँकांना मोठी टक्कर दिली आहे.
अन्य वर्गवारीच्या पातळीवर नियो बँकिंगमध्येही व्यवहार झाले आहेत. यातील सेगमेंटमध्ये योनो नंबर एक वर राहिली आहे. यानंतर नियो आणि कोटक 811 व्या नंबरवर आहेत.
अव्वल स्थानी असलेल्या बँका
उपलब्ध अहवालात 2020 मध्ये ग्राहकांना सेवा देण्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, यस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचएसबीसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, डयूश बँक आणि आयडीबीआय बँक यांचा पहिल्या दहामध्ये समावेश राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.









