रेशन कार्ड नसलेल्या बाहेरगावातील कुटुंबांना, गरजू विद्यार्थ्यांना ग्राहक पेठेतर्फे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत 2 हजार 100 धान्याचे किट देण्यात आले. शहर व उपनगरांतील विविध भागांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी हे किट पोहोचविले आहेत.
टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेमार्फत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत व सामान्य नागरिकांच्या सहकार्याने हे किट देण्यात आले आहेत. उपक्रमाकरीता शैलेश राणीम, किरण गुंजाळ, उदय जोशी, सुनील वाणी यांसह सूर्यकांत पाठक, संचालक अनंत दळवी, अलका दळवी, सतिश जैन, जयंत शेटे यांनी पुढाकार घेतला.
सूर्यकांत पाठक म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या या किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, दोन किलो साखर, एक लिटर तेल, 200 ग्रॅम चहा व 200 ग्रॅम मसाला इत्यादी साहित्य देण्यात आले आहे.








