प्रतिनिधी /बेळगाव
येथील वरिष्ट वकील कमल किशोर जोशी यांची जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. ग्राहक न्यायालयाचे खंडपीठ अध्यक्ष, सदस्य, व महिला सदस्य असे तीन सदस्यांचे आहे. या तीन पदांकरिता संपूर्ण कर्नाटक राज्यातील सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच वरिष्ट वकील अशा 645 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून ऍड. कमल किशोर जोशी यांची निवड झाली आहे. या पदाकरिता झालेल्या लेखी परीक्षेत तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ग्राहक व्यवहार सचिव आणि कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव यांचा समावेश असलेल्या निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीत ते यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.









