प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा ग्राम पंचायत निवडणुकीतील ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून, सर्व जनतेतून पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या आणि नवख्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे तसेच अन्य आरोप करून आपल्या अवैद्य व्यवसायांवर पडदा झाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला आहे. विरोधकांच्या आमिषाला न भूलता ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांच्या चिन्हासमोर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन रविवारी झालेल्या बैठकीत ग्राम विकास आघाडीचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी केले आहे.
ग्राम विकास आघाडीच्या वतीने ग्राम पंचायतच्या विविध वॉर्डमध्ये 20 नागरीकांना उमेदवारी दिली आहे. गावचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून स्वच्छ प्रतिमेच्या नवख्या नागरिकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या सदस्यांनी ग्राम पंचायतमध्ये किंवा वैयक्तिकरीत्या कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र सध्या गावातील नागरिकांतून ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. सर्व उमेदवारांना मतदान करून बहुसंख्य मतानी निवडून देण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा पाहून विरोधकांना धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध मार्गाने आरोप करून नवख्या उमेदवारांना भ्रष्ट ठरवण्याचा प्रकार चालविला आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला वाव मिळू नये याकरिताच यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. ग्रामपंचायतचा सरकारी कारभार बदलला आहे. कायद्याची जाणीव आणि जनतेच्या समस्या याची जाणीव असलेल्या सुशिक्षीत आणि सूज्ञ उमेदवारांची निवड ग्राम विकास आघाडीने केली आहे. त्यामुळेच हिंडलगा गावातील प्रत्येक गल्लीतील मतदार ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठिशी ठाम आहेत. भूल थापांना तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांना न भूलता ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जि. पं. कडे पाठपुरावा करून गावात दोन विहिरींची खोदाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचा विकास, गटारीचे बांधकाम, तलावांचे पुनरूज्जीवन अशा विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यापुढे देखील ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून ग्राम पंचायतचा कारभार पारदर्शी करण्यासाठी उमेदवारांकडून वचन घेतले आहे. त्यामुळे ग्राम विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. ग्राम पंचायतचा कारभार स्वच्छ करण्यासह गावातील अवैद्य कारभार हद्दपार करण्यासाठी गावकऱयांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे ग्राम विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतानी विजयी करून ग्रामपंचायतमध्ये एकहाती सत्ता मिळविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन ग्राम विकास आघाडीचे मार्गदर्शक रमाकांत पावशे आणि निवृत्त जिल्हा न्यायाधिश एल. एस. पावशे यांनी केले आहे.
गावच्या विकासासाठी खालील उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वॉर्ड क्रमांक 1-कोकीतकर बबिता भुजंग (कप-बशी), दीपा मारुती तळवार(ऑटोरिक्षा), यल्लाप्पा गुंडू काकतकर (टॅक्टर चालविणारा शेतकरी). वॉर्ड क्रमांक 2-कुद्रेमनीकर रामचंद्र शंकर(कप-बशी), जकाणे ललिता अर्जून (टॅक्टर चालविणारा शेतकरी),पावशे रेखा मारुती (प्रेशर कुकर), पावशे विनायक बाळकृष्ण (ऑटोरिक्षा).वॉर्ड क्रमांक 3-गायत्री गणेश काकडे (कप-बशी),संदीप मोरे काशीनाथ(ऑटोरिक्षा). वॉर्ड क्रमांक 4-प्रकाश गुंडोजी बेळगुंदकर (तुतारी वादक), शितल अप्पाजी गावडे (प्रेशर कुकर), सुनिल रामा काकतकर(कप-बशी),वॉर्ड क्रमांक 5-कल्पना अशोक कडोलकर(कप-बशी),महादेव बाळकृष्ण लोहार (प्रेशर कुकर),लक्ष्मी धर्मू खातेकर(काचेचा ग्लास),श्रीदेवी बैजुसिंग अवस्थी (स्टील कपाट), वॉर्ड क्रमांक 6-पिसे लक्ष्मी जगदीश (कप-बशी),राहुल अशोक हुलजी (टॅक्टर चालविणारा शेतकरी). वॉर्ड क्रमांक 7-धाडवे निर्मलकुमार बापुसाहेब(टॅक्टर चालविणारा शेतकरी).वॉर्ड क्रमांक 14-अशोक निंगाप्पा कांबळे(ऑटोरिक्षा).









