प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतमधील कर्मचाऱयांना वेळेत वेतन याचबरोबर पेन्शन द्यावी, नियमानुसार बढती द्यावी यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
राज्यामध्ये जवळपास 63 हजार ग्राम पंचायत कर्मचारी आहेत. त्यांना वेळेत वेतन दिले जात नाही. याचबरोबर निवृत्तीनंतर पेन्शनदेखील देण्यात येत नाही. 700 स्वच्छता कर्मचाऱयांवर एका निरीक्षकाची नेमणूक करावी. यासह इतर मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी नोकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








