वार्ताहर / उदगाव
राज्याभरात सहकाराचे जाळे विणले गेले असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा कोल्हापूर जिल्हयाचा आहे. याच माध्यमातून गावागावात पतसंस्थांची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील विकासामध्ये पतसंस्थांचे योगदान मोठे असल्याचे उद्गार राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. उदगांव (ता.शिरोळ) येथे ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थ मर्या. हसुर या संस्थेचा उदगाव शाखेचे नवीन जागेत स्थलांतर सोहळा संपन्न झाला. यावेळी आरोग्यमंत्री यड्रावकर बोलत होते. यावेळी बोलताना नामदार डॉ. यड्रावकर पुढे म्हणाले
स्व. ए.पी.पाटील यांनी ग्रामीण भागात नागरीकांच्या गरजा भागविण्यासाठी भिशीची निर्मिती केली होती. नागरीकांचा विश्वास जोपासण्यासाठी 1990 च्या काळात या भिशीच्या माध्यातुन सर्वोदय पतसंस्थेची स्थापना केली. हसूर, उदगांव व उमळवाड या तीन शाखा निर्मितीनंतर आता त्यांचे वटवृक्ष रूपांतर होवून सध्या 16 शाखा कारर्यत आहेत. ए.पी.पाटील सर्वोदय पतसंस्थेचे लवकरच बँकेत रुपांतर होईल, असा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते वास्तूचा स्थलांतर सोहळ्याचा शुभारंम करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक संचालक रमेश चौगुले यांनी केले. यावेळी जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक म्हणाले, ए.पी.पाटील सर्वोदय पतसंस्थेने राज्यात आदर्श निर्माण केला असून ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक विकासास चालना दिली आहे. उदगांव शाखेच्या ठेवीत नव्याने दुपटीने वाढ होईल असे त्यांनी सांगितले. जिल्हा परीषदेच्या समाजकल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या, येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शाखा गावभागात आणून ग्राहकांना विशेषता महिलांना चांगली सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्या मुळे पतसंस्थेला याचा लाभ नक्कीच मिळेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, संस्थे चे चेअरमन बाबासाहेब पाटील, व्हा. चेअरमन दादा शंकर चौगुले, शरद कारखान्याचे व्हा. चेअरमन थबा कांबळे, यांच्यासह सर्व संचालक, सल्लागार,सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









