ऑफलाईन वर्गांना प्रारंभ, पहिल्या दिवशी उपस्थितीती कमी
प्रतिनिधी /बेळगाव
शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या ऑफलाईन वर्गांना प्रांरभ झाला आहे. सोमवारी सकाळी बऱयाच दिवसानंतर ग्रामीण भागातील शाळांचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी बहरलेला पहायला मिळाला. दरम्यान सकाळी शाळेच्या व्हराडय़ात प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. शिवाय खबरदारी म्हणून शाळांच्या वर्ग खोल्यांतून देखील सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती.
कोरोनामुळे मागील काही महिन्यापासून शाळा बंद होत्या. मात्र सोमवारपासून शाळा पुन्हा एकदा पूवर्वत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे गणवेश घालून शाळेत हजर झाल्याचे चित्र ग्रामीण भागातील गावो-गावी असलेल्या हायस्कूलमधून पहायला मिळाले. विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गात उपस्थित राहण्याची सक्ती नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थितीती देखील काही प्रमाणात कमी होती. दरम्यान विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय कोरोना नियमांचे पालन करून शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करावे लागले. दरम्यान विद्यार्थ्यांना गुप करून थांबू नये, शैक्षणिक साहित्याची देवाण-घेवाण करू नये, अशा सूचना करण्यात आल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास देखील शिक्षकांनी व्यक्त केला.
वर्ग खोल्या शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शनिवारी व रविवारी शाळांमधून खबरदारी म्हणून स्वच्छता व वर्ग खोल्या शाळा परिसराचे निर्जुंकीकरण करण्यात आले होते.









