बेंगळूर/प्रतिनिधी
ग्रामीण भागात रुग्णांना गृह अलगीकरण सुविधा उपलब्ध नसल्यास संक्रमित व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येईल असे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोविड संसर्गग्रस्त व्यक्तींना ग्रामीण भागात घरी अलग ठेवण्याची सुविधा उपलब्ध नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येईल. याठिकाणी रुग्णावर उपचार केले जातील. यासाठी स्थानिक टास्क फोर्सला जबाबदार धरले जाईल असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
मंत्री म्हणाले की, बुथ लेव्हल टास्क फोर्सची स्थापना केली जाईल ज्यात स्थानिक भागातील सदस्य असतील आणि ते स्थानिक पातळीवर कोविडचे व्यवस्थापन करतील. जर अलगीकरणासाठी घरात वेगळ्या सुविधा उपलब्ध न झाल्यास रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल, असे ते म्हणाले.









